अंधश्रद्धा एक शाप मराठी निबंध | अंधश्रद्धा निबंध 2023 | Best Andhashraddha Essay In Marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण अंधश्रद्धा एक शाप म्हणेजच अंधश्रद्धा निबंध म्हणजेच andhashraddha essay in marathi ह्या विषयावर निबंध बघणार आहोत . andhashraddha marathi lekh म्हणजेच अंधश्रद्धा निबंध आपण १०० , ३०० आणि ५०० शब्दात जाणून घेणार आहोत . ह्या पोस्ट च्या मदतीने तुम्ही अंधश्रद्धा एक शाप मराठी निबंध सहज अभ्यासात व परीक्षेत लिहू शकता .

अंधश्रद्धा मराठी निबंध | Andhashraddha Marathi Lekh In 100 , 300 And 500 Words

अंधश्रद्धा एक शाप मराठी निबंध 100 शब्दात | Andhashraddha Essay In Marathi In 100 Words

विसाव्या शकतात सुद्धा लोक अंधश्रद्धे वर विश्वास करतात . किती लाजिरवाणी गोष्ट आहे . मग एवढं शिक्षण घेऊन काय फायदा ? अंधश्रद्धा असण्याच सर्वात मोठं कारण आपल्या मनात असणारी भीती . मग ती मरणा बाबत असू शकते किंवा कोणत्या इतर गोष्टीवरून परंतु हीच भीती आपल्या अंधश्रद्धेचं बीज पेरते व हीच अंधश्रद्धा पिढ्यानपिढ्या चालत राहते .

अंधश्रद्धा एक शाप मराठी निबंध | अंधश्रद्धा निबंध 2021 | Best Andhashraddha Essay In Marathi

त्यामुळे जर आपल्या प्रगती करायची तर आजच ह्या अंधश्रद्धेच्या तावडीतून सुटका करून घेऊया अशी प्रत्येकानी प्रतिज्ञा करून मी अंधश्रद्धा ठेवणार नाही आणि कोण ठेवत असेल तर त्याची अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करिन. जर प्रत्येकानेच हा ध्यास मनी बाळगला तर अंधश्रद्धेची कीड कायमची ठेचली जाईल .

अंधश्रद्धा एक शाप मराठी निबंध 300 शब्दात | Andhashraddha Essay In Marathi In 300 Words

अंधश्रद्धा एक शाप हे बरोबरच आहे . ह्या वर तुमचं काय मत आहे ? पहिला तर जाणून घेऊ अंधश्रद्धा म्हणजे नेमकं काय ? अंधश्रद्धा म्हणजे कुठल्या हि गोष्टीचा विचार न करता डोळे बंद करून त्यावर विश्वास ठेवणे व त्याच्या सगळ्या मर्यादा ओलांडून श्रद्धा ठेवणे मग ती श्रद्धा देवा वर असो किंवा माणसावर . अंधश्रद्धेचे पहिले कारण हे आहे भीती . मरण्याची भीती ,परीक्षेत नापास व्हायची भीती , नोकरी न मिळण्याची भीती इत्यादी . असे अनेक भीतीदायक प्रसंग आहेत ज्यात माणूस स्वतःला कमजोर समजतो .

व तीच भीती दूर करण्यासाठी माणूस अंधश्रद्धेची मदत घेतो . व हेच काम त्याला अंधश्रद्धाळू बनवते . भारत देशात सर्वात जास्त अंधश्रद्धा आहे . कारण इथे देवाला माणसे खूप मानतात . व ह्याच मुळे काही लोक ह्यचा गैरफायदा घेतात . माझे असे मत आहे कि ईश्वराला मानलेच हवे . व त्या बद्दल श्रद्धा असणे काही वाईट गोष्ट नाही आहे . परंतु त्यापेक्षा हि जास्त गरजेची गोष्ट आहे ती खऱ्या व खोट्या मधील फरक ओळखण्याची क्षमता . कोणत्याही मनुष्याला सर्वात वर मानवता धर्म मानायला हवा .

अंधश्रद्धा एक शाप मराठी निबंध | अंधश्रद्धा निबंध 2021 | Best Andhashraddha Essay In Marathi

कारण मानवता धर्मा पेक्षा कोणता हि धर्म मोठा नाही . व आपल्या मधील ह्याच भीती चा फायदा ते ढोंगी बाबा उठवतात . जे स्वतःला देवाचे नाव देऊन असे वाईट कर्म करतात ज्याचा कोणी विचार सुद्धा करू शकत नाही . शाळेत व कॉलेज ला सुद्धा जाणारी मुले ह्यात कमी नाही आहेत . कुठल्या तरी बाबा नी दिलेला गंडादोरा बांधून परीक्षेत यश मिळवण्याची स्वप्न बघत असतात .असे अनेक उपाय आहेत ज्यांच्या मदतीने आपण ह्या अंधश्रद्धेला हरवू शकतो .

स्वतः वर विश्वास ठेवणे , आपल्या मधील भीतीला दूर करणे अश्या गोष्टी जर केल्या तर अंधश्रद्धा हि कायमची दूर होईल वेळ लागणार नाही व ह्या मुळे मानवाचे सुद्धा कल्याण होईल व आपला भारत देश आणखी प्रगती करेल .

Read Also – गुढीपाडवा निबंध In Marathi 2021 – Best Gudi Padwa Essay In Marathi

अंधश्रद्धा एक शाप मराठी निबंध 500 शब्दात | Andhashraddha Essay In Marathi In 500 Words

कुठल्याही गोष्टीचा वैद्यानिक दृष्टया विचार न करता त्या गोष्टीवर विश्वास ठेवणे त्याला अंधश्रद्धा असे म्हणतात मांजर आपल्या रस्त्यांमधून गेली म्हणून आपले काम होणार नाही, किंवा कोणी शिंका दिली तर काहीतरी दुर्घटना होईल किंवा होणारे काम होणार नाही, छतावर कावळा ओरडत असेल तर आपल्या घरी कोणीतरी नातेवाईक किंवा पाहुणे येणार आहेत अशी कल्पना करणे यालाच अंधविश्वास असे म्हणतात .

कारण या सगळ्याचा वैज्ञानिक दृष्ट्या विचार केला तर या सगळ्या गोष्टी अतार्किक व तद्यहीन आहेत. आपल्यामधील अशी काही लोक आहेत जे कुमार्गाने पैसा कमावतात . लोकांना लुबाडतात व त्याच्या पैशाने देवाला हार , मिठाई, नारळचढवतात व त्यामधून त्यांना असे वाटते की हे सगळं केल्याने आम्हाला स्वर्गात स्थान मिळेल पण हे सगळं चुकीचा आहे . तुम्ही वाईट काम करत असाल व तुम्ही मानवताधर्म न मानता तुम्ही पूर्णपणे अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत आहात. त्यापेक्षा गरिबांना मदत करा व चांगले कर्म करा जे देवाला सुद्धा आवडतील .

आपल्या समाजात अनेक परंपरा जपल्या जातात . माणसाने त्या रूढी परंपरा जपाव्या परंतु त्या मध्ये श्रद्धा बघावी आणि अंधश्रद्धा नाही . लोक सण असतात तेव्हा मंदिरात जाणून दान करतो मग ते पैसे असतील किंवा दुसरे काही . खरं त्या पैश्याची देवाला काय गरज आहे . त्यापेक्षा एखाद्या गरजू माणसाला ते पैसे द्या . सणाच्या वेळी आपण उपवास सुद्धा केले जातात . परंतु आपल्या शरीराला न खाल्याने त्रास होऊ शकतो . व असा त्रास स्वतःला देऊन तो देव तरी खुश होणार आहे का ? पहिल्या काली सणाच्या निमित्ताने उपवास ठेवले जात होते कारण शरीराला सुद्धा त्याच्या रोजच्या कामातून एक दिवस आराम मिळावा म्हणून .

अंधश्रद्धा एक शाप मराठी निबंध | अंधश्रद्धा निबंध 2021 | Best Andhashraddha Essay In Marathi

आणि हे बरोबर सुद्धा आहे . परंतु ह्या उपवासाला सुद्धा लोकांनी देवाचे नाव जोडले . व हि एक श्रद्धा न राहून अंधश्रद्धे मध्ये त्याच रूपांतर झालं आहे . आपण देवाच्या नावाने खूप साऱ्या गोष्टी चुकीच्या करतो . देवाला पेढे चढवणे किंवा कोणता हि नैवद्य परंतु आपण तीच गोष्ट जर भुकेलेल्या माणसाला दिली तर देवाला हि आवडणार का ? आपण जे नैवद्य चढवतो तो देव खात तरी असेल का ? आपण उगाच या सगळ्या गोष्टी देवा समोर सडवून वाया घालवतो . तर तीच श्रद्धा ठेवून तुम्ही लोकांच भलं केलं तर देवाला नाही आवडणार का हे सगळं ? परंतु माणसाने देवाला सुद्धा आपला व्यवसाय बनवून टाकला आहे .

आणि आपण त्या गोष्टीला बळी पडतो . जर तुमच्या श्रद्धेतून कोणाला ट्रेस होणार नसेल किंवा स्वतःचे हि काही नुकसान होणार नसेल तर ती श्रद्धा जरूर जपावी . तुम्ही तर ऐकलेच असेल देवाला कोंबड्या बकऱ्यांचा बळी दिला जातो . सांगा बरं देवाने असा कधी सांगितलंय का कि मला कोंबड्या व बकऱ्यांचा बळी लागतो . नाही ना ? मग आपण का करतो हे . अंधश्रद्धेच्या पायी आपण बिचाऱ्या त्या मुक्या जनावरांचा जीव घेतोय . हे करून काय मिळणार आहे आपल्याला .

अंधश्रद्धा हि तर आपल्या देशाला लागलेली कीड आहे . आपण बऱ्याचदा असे ऐकले असेल कि अंधश्रद्धा हि जास्त करून अशिक्षित लोक पाळतात . परंतु आपल्या सारखे शिक्षित लोक हि काही कमी नाही आहेत . तुम्ही बातम्यांमध्ये तर बऱ्यांच वेळा ऐकलं असेल कि गुप्तधनाचा डावाचा पडदा फाश केला गेला . त्यामुळे ह्या अंधश्रद्धेचा परिणाम आपल्या पुढच्या पिढी वर होऊ नये म्हणजे झालं . त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम आपण स्वतः पासूनच सुरवात करायला हवी तरच ह्या शापातून आपली सुटका होईल .

निष्कर्ष ( conclusion )

ह्या पोस्ट मध्ये आपण अंधश्रद्धा निबंध म्हणजेच andhashraddha essay in marathi ह्या विषयावर निबंध बघणार आहोत . andhashraddha marathi lekh म्हणजेच अंधश्रद्धा एक शाप निबंध आपण १०० , ३०० आणि ५०० शब्दात जाणून घेणार आहोत . तुम्हाला इतर विषयांवर निबंध हवा असल्यास कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करा व हि पोस्ट तुमच्या शाळेतील मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका .

तुम्हाला जर मराठी मध्ये Blogging In Marathi बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर मराठी जीवन ह्या वेबसाइट ला नक्की भेट द्या.

Leave a Comment